Marathi Poem

वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का....
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...?

पूर्वी तू माझ्याशी
खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढायचास
तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचास
नसले विषय तरी
नविन विषय काढायचास...
काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचास
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचास
आता कशाला आमची गरज पडेल
असं म्हणून सारख चिडवायचास
माझा चेहरा पडला तर
खुप नाराज व्हायचास
मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचास...

आज ही मला तुझा
प्रत्येक क्षणी भास होतो
का रे असा वागतोस
का देतोस त्रास
नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
शेवटचं एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास...

वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...
शेवटचं एकदाच मला भेटशील का...?